नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प शेतकऱ्यांना ठरणार क्रांती

Fri 04-Apr-2025,06:07 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी :-उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ४ तालुक्यातील नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत ४० गावाची निवड करण्यात आली.त्यामध्ये कनेरी हा गाव असून या ठिकाणी सुष्म नियोजन आराखडा तयार करण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. हा कार्यक्रम ५ दिवस चालणार आहे.कनेरी येथील मशाल फेरीचे वरूण राज्याने दमदार पावसाने स्वागत केले. या मशाल फेरीत ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैलगाडीला सजवून घोषवाक्ये देत प्रकल्पाची जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडसा येथील उपविभागीय कृषि अधिकारी महेश परांजपे,आरमोरी तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम,वडसाचे तालुका कृषि अधिकारी रुपेश कांबळे, कुरखेडा तालुका कृषि अधिकारी रुपाली जाधव मॅडम,कोरचीचे तालुका कृषि अधिकारी नागेश मिसाळ, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी वैशाली ससाने,मंडळ कृषि अधिकारी जोत्सना घरत, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प सुक्ष्मनियोजन समन्वयक आक्रोश खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व प्रथम ग्राम कृषि विकास समिती स्थापन केली.यामध्ये पदसिद्ध सदस्य वैशाली चापले, दुर्वास नैताम,उदाराम नैताम,विकास नैताम,राजेंद्र चापले,लता कुनघाटकर,शारदा नैताम,दिगांबर नैताम,गयाबाई चापले तसेच स्वयंसेवक प्रमोद नैताम,गुणवंत नैताम,सुंदरा नैताम, वनिता नैताम, यशोदा नैताम आदिची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम यांनी सांगितले की, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ हा सहा वर्षांसाठी चालणार असून त्यात शेतीनिगडित उपयोगी असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच गटामार्फत विविध प्रकारच्या योजना, उद्योग या योजनेत समाविष्ट असल्याने त्यात गावकऱ्यांनी तयार केलेली कृषि विकास समिती नियोजन आराखडा तयार करील यात गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला लाभ मिळण्यासाठी ही समिती काम करणार आहे.त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी अँग्रीस्टाक(शेतकरी फार्मर आयडी)असणे गरजेचे आहे.गावातील बंधारे,तलाव मातीनमुने व इतर नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा अंतर्गत विकसित क्रांती घडविण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून सहा वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात उपविभागीय कृषि अधिकारी महेश परांजपे यांनी सांगितले की,नानाजी देशमुख कृषि संजीवनी टप्पा प्रकल्प २ अंतर्गत तळागाळातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे.त्यासाठी गावकऱ्यांनी अंत्यत सुक्ष्म पद्धतीने नियोजन करून आमचा गाव आमचा विकास ही संकल्पना हाती घेऊन क्रांती घडविण्याचे काम साकार होणार आहे.यासाठी कोणतेही हेवेदावे न करता भुमिहिन ते सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.कार्यक्रमाचे संचालन वसंत शेंडे तर आभार कृषिसहाय्यक कु.कल्पना ठाकरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरमोरी,वडसा, कुरखेडा,कोरची,या तालुक्यातील कृषि अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.