100 दिवस कृती कार्यक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम विविध शासकीय योजना व दाखले वाटप शिबिर

Thu 03-Apr-2025,10:32 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा 

सालेकसा -तहसील कार्यालय सालेकशाच्या वतीने 100 दिवस कृती कार्यक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत विविध शासकीय योजना व प्रमाणपत्र दाखले वाटप शिबीर तहसील कार्यालय सालेकसर चा वती ने शंभर दिवस कृती कार्यक्रम नवीन पूर्ण उपक्रम अंतर्गत शासकीय योजना व प्रमाण पत्र दाखिले वाटप शिबिर चे आयोजन शासकीय आश्रम शाळा जमाकूड़ो येथे तीन एप्रिल रोजी घेण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुखांनी उपस्थित एस.डी.एम कविता गायकवाड यांनी शिबिर ला भेट दिली.नंतर प्रत्येक टेबलावर जाऊन कर्मचारी लोकांसोबत संवाद साधला. कार्यक्रमात तहसीलदार नरसय्या कोंडगुराले,नायब तहसीलदार अमृता सुतार, निवडणूक अधिकारी टी.आर.गिरीपुंजे,निरीक्षक सतीश डोंगरे,राजस्व निरीक्षक,तलाठी,पोलीस पाटील व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून शंभर दिवस कृती योजना अंतर्गत उपक्रमामध्ये आधार अपडेट करणे, फार्मर आयडी, संजय गांधी निराधार योजना, नवीन राशन कार्ड बनविणे, किंवा नाव दाखल व नाव वगळले निवडणूक फॉर्म भरणे जे 18 वर्ष पूर्ण झालेले युवक युतीचे, मनरेगा चे काम ,जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखले ,जाती प्रमाणपत्र, सेतू अंतर्गत येणारे सर्व कार्य, प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत शासकीय योजना ची माहिती व फॉर्म भरून देने भरणे, पी.एम.किसान चे नवीन फॉर्म भरणे, विविध योजनांची माहिती देऊन नाविन्यपूर्ण उपक्रम ला उत्कर्ष प्रसाद मिळाला आहे आणि शासन आपले दारी येऊन गोरगरिबांचे कार्य करण्याकरिता तहसील कार्यालयास सालेकसा सदैव लोकांशी पाठीशी आहे,असे व्यक्त तहसीलदार नरसैय्या कोंढागुरले यांनी म्हटले आहे. कार्यक्रमच्या मध्यंतरात गरजू लोकांना एस.डी.एम. कविता गायकवाड व तहसीलदार च्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी बनविण्याकरिता तहसील कार्याचे कार्यालयाचे कर्मचारी, आश्रम सालाचे कर्मचारी, आश्रमशाला जमाकुडूचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मदत करून कार्यक्रम यशस्वी यशस्वी करिता परिशर्म घेतले.