गडचिरोली जिल्हा दुरसंचार बि.एस.एन.एल.सल्लागार समितीवर दिलीप घोडाम यांची वर्णी

Fri 25-Apr-2025,04:59 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली 

आरमोरी - वयाच्या विसाव्या वर्षांपासून समाजसेवेला वाहून घेणाऱ्या गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांचेवर गडचिरोली जिल्हा दुरसंचार बि.एस.एन.एल. समितीवर सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात आली असून ही निवड गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या शिफारशी वरुण केंद्रीय दुरसंचार व उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांनी केली आहे. दिलीप घोडाम यांच्या सामाजिक कार्याचा हा गौरव असून दुरसचार बि.एस.एन.एल. सेवा अधिक कार्यक्षम होण्यास हातभार लागेल अशी जिल्हावासि्यांनी आशा व्यक्त केली असून दिलीप घोडाम यांचे विविध क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.राजकिय क्षेत्रात अनेक महत्वाच्या पदावर राहून जबाबदाऱ्या यशस्वी रित्या पार पडणाऱ्या दिलीप घोडाम यांनी आपले पाय जमिनीवरच ठेऊन गोरगरीब,वंचित, शोषित,विधवा,निराधार,शेतकरी,शेतमजूर यांच्या समस्यांना नेहमीच प्राधान्य दिले. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता " हक्काचा माणूस" म्हणून मोठ्या आशेने त्यांचेकडे पाहते.पद, पैसा, प्रतिष्ठा, पुरस्कार यांचे पासून दूर राहुन त्यांनी केलेल्या कार्याचे मोल ओळखून काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांचेवर महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. केवळ वयाच्या विसाव्या वर्षांपासून सामाजिक आणि राजकिया क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या घोडाम यांनी न डगमगता रस्त्यावर ऊतरून अनेक यशस्वी आंदोलने केली. त्यामुळेच कार्यकर्ता ते जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव असा राजकिय प्रवास सुरु झाल्यानंतर गडचिरोली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष या पदावर ते कार्य करीत आहेत. एवढेच नाही तर यांसह अनेक पदे सांभाळत आहेत.दिलीप घोडाम यांच्या सामाजिक आणि राजकिय अनुभवाचा उपयोग जिल्ह्यातील दुरसचार बि.एस.एन.एल. सेवा सुरळीत रित्या सुरु राहण्याकरिता उपयोग व्हावा व वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहावे उदात्त हेतूने त्याची भारत सरकारच्या गडचिरोली जिल्हा दुरसंचार बि.एस.एन.एल. विभागाच्या सल्लगार समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली. जिल्ह्यातील बि.एस.एन.एल. ची ढेपळालेली सेवा सुरळीत रित्या सुरु राहिल अशी आशा जिल्हावाशियांनी या निमित्याने व्यक्त केली आहे.भारत सरकारच्या एवढ्या नामांकित विभागावर दिलीप घोडाम यांची वर्णी लागल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांनी या निवडीचे श्रेय गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार नामदेव किरसान,आमदार विजय वडेट्टीवार,आमदार रामदास मसराम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांना दिले आहे.