एम.पी.डी.ए.मधील अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांच्या ताब्यात

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
नागपुर:पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत राहणारा सराईत आरोपी नामे सोहेल अब्दुल खान, वय २३ वर्षे, रा कन्हान खदान क्रमांक ३, ता.पारशिवणी हा परीसरात गुंडगिरी करून गंभीर दुखापत,अवैध शस्त्रे बाळगणे, चोरी या सारखे अनेक शरीरा विरूध्द तसेच मालमत्ते विरूध्दचे गंभीर गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असमाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित असतो. नागपुर ग्रामीण पोलीसांना त्याचेविरूध्द जेव्हा जेव्हा तकारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवुन त्याचे विरूध्द गुन्हे नोंद केले व त्याला अटक केले आहे. आरोपी नामे सोहेल अब्दुल खान याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपी नामे सोहेल अब्दुल खान याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली.आरोपीचे कृत्य समाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने हर्ष ए. पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली खापरखेडा पोलीसांकडुन एम.पी.डी.ए. कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली होती. दिनांक १४/११/२०२४ रोजी जिल्हाधिकारी नागपुर यांनी सराईत गुन्हेगार सोहेल अब्दुल खान,याचे विरूध्द स्थानबध्दतेता आदेश काढला होता. परंतु नमुद सराईत आरोपी तेव्हा पासुन मिळुन येत नव्हता.हर्ष ए. पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा आणि रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांनी गुप्तबातमीदार आणि तांत्रिक पुरावे यांच्या मदतीने नमुद आरोपीचा शोध घेवुन त्याला आज दिनांक २५/०४/२०२५ रोजी ताब्यात घेतले. पुढील कारवाई साठी आरोपीस खापरखेडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.