लुटमारी करणाऱ्या तीन नकली पोलीसांना केले अटक बल्लारपूर पोलिसांची कारवाई

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: स्वतःला पोलीस असल्याचे सांगून तिघांनी वरुर येथील एका तरुणाला अंधारात नेऊन मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची अंगठी व रोख लुटून नेले होते. फिर्यादी ने तक्रार दाखल करताच पोलीसांनी गोपनीय माहिती चे आधारे तीन आरोपींना अटक केले. हितेश सुधाकर साखरे (३५) रा. रविंद्र नगर वार्ड, बल्लारपूर, शाहरूख शेरखान पठाण (२९) रा. रविंद्र नगर वार्ड, बल्लारपूर, पप्पु उर्फ अजगर मोहन गायकवाड (२८) रा. रविंद्र नगर वार्ड बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे.पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे २४ एप्रिल चे रात्रौ ९. ३० ते १० :३० वाजताच्या सुमारास फिर्यादी संतोष नरसय्या उपटलावार (३२) रा.वरूर ता. राजुरा जि. चंद्रपुर यांना पोलीस असल्याची बतावणी करून तीन अज्ञात इसमांनी बल्लारपुर बस स्टॉप येथुन त्यांचे दुचाकी वर बसवुन संत तुकाराम हॉल, बल्लारपुर येथे घेवुन जावुन फिर्यादीस मारण्याची धमकी देवून त्याचे खिशातील ३००/- रू व हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढुन घेवुन पळुन गेले अशा फिर्याद वरून पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे अप. क. २९९/२५ कलम ३०९ (४), ३(५), २०४, ३५१ (२), १२७ (७) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करून तात्काळ गुन्हे शोध पथक घटनास्थळी रवाना करून गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेले मालाचा शोध घेतला असता मुखबीरचे गोपणीय माहीतीवरून आरोपी हितेश सुधाकर साखरे (३५) रा. रविंद्र नगर वार्ड, बल्लारपूर, शाहरूख शेरखान पठाण (२९) रा. रविंद्र नगर वार्ड, बल्लारपूर, पप्पु उर्फ अजगर मोहन गायकवाड (२८) रा. रविंद्र नगर वार्ड बल्लारपूर यांना ताब्यात घेवुन सखोल तपास केला असता सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुली देवुन गुन्हयातील जबरीने हिसकावुन नेलेली अंगठी व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड (प्रभारी अधिकारी), सहायक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, खंडेराव माने, लखन चव्हान, शेखर माथनकर, भास्कर चिंचवलकर व म.पो. अंमलदार अनिता नायडू, इत्यादी पो. स्टाफ ने करत अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.