हिंगणघाट महोत्सव व एक्सपो 2025 मध्ये हिंगणघाट भूषण गौरव वितरण

अब्दुल कदीर बख्श ( हिंगणघाट )
हिंगणघाट मध्ये टाका ग्राउंडवर सुरू असलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये हिंगणघाट शहराकरिता बहुमोल कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना हिंगणघाट भूषण म्हणून गौरविण्यात आले. यामध्ये जागतिक ख्यातीचे चित्रकार व शिल्पकार हरिहर पेंदे,हिंगणघाट शहर हिरवेगार करण्याचे स्वप्न बाळगणारे नितीन क्षिरसागर व त्यांचा वृक्ष मित्र परिवार, फक्त दहा रुपये नाममात्र तपासणी फी घेऊन रुग्णसेवा करणारे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगाधरराव नाखले , दिव्यांग कलाकार (हाताला पुरेशी बोटे नसतानाही थर्माकोल वरील अप्रतिम कलाकृती काढणारे ) कलाकार कैलास आत्राम, सर्पमित्र प्रवीण कडू, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नुकतीच योगासन मध्ये नोंद झालेले शाम गावंडे, आय.ए.एस. अधिकारी संकेत वाघे, 19 वर्षा आतील वर्ल्ड कप क्रिकेट संघात 2008 मध्ये निवड झालेले व भारताला विजय मिळवून दिलेले चंद्रशेखर आत्राम, हिंगणघाट मध्ये विविध क्षेत्रातील वैद्यकीय, व्यावसायिक व उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करून देणारे डॉक्टर उमेश तुळसकर, एम. पी. एस. सी. 2024 मधे उतीर्ण झालेली कु. पुजा धोपटे, रुग्णमित्र गजू कुबडे, पुलवामा हल्ल्यात जखमी झालेले सी.आर.पी.एफ. जवान प्रकाश धोटे, शालेय स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणारे व 97 वेळेस रक्तदान करणारे सुबोध महाबुधे, जीव रक्षक फाउंडेशनचे राकेश झाडे, रांगोळी कलाकार योगेश हेडाऊ, इस्त्रो मध्ये निवड झालेला नवव्या वर्गातील विद्यार्थी यथार्थ जनईकर, साडेचार वर्षाचा शारव श्रैणीक कासवा ( गुगल लिपी मधे वर्ड बुक रेकॉर्ड ) तसेच नॅशनल शूटिंग बॉल अनंतपुरम येथे सहभागी झालेले गाडगेबाबा व्यायाम शाळेचे खेळाडू व कोच यांचा गौरव करण्यात येत आहे. के. टी. महाजन शाळा (पिपरी )आणी मुक्तांगण कान्वेंट च्या विद्यार्थ्यांनी आपल्या सासंकृतिक कार्यक्रमा द्वारे गायन व नृत्य कला सादर केली.
या महोत्सवाचे उद्घाटन हिंगणघाट कृ.उ.बा.स.चे सभापती व वणा नागरिक सहकारी बॅक चे संस्थापक अध्यक्ष आदरनिय सुधिरबाबु कोठारी तसेच म. रा.वि.वि.कं चे महाप्रबंधक नंदकिशोर पांडे मुंबई यांच्या हस्ते पार पडला असुन समारोपीय कार्यक्रम शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते पार पडला. हिंगणघाट महोत्सव ला यशस्वी करण्याकरीता महोत्सवाचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर, स्वागताध्यक्ष संजय कासवा, वासुदेव पडवे, प्रोजेक्ट डायरेक्टर प्रशांत पांडे, सुरेंद्र टेभुर्णे, सोनु करोसिया, सर्व कोर कमेटीचे पुरुष व महिला सभासद, कोचिंग क्लास संघटना, मानवाधिकार सहायता संघ, सर्व सामाजिक संघटना, सर्व व्यापारी संघटना, सर्व मांन्यवर पत्रकार संघ, शहरातील नागरीक व विद्यार्थी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.