भिवापूर तालुक्यात भरधाव ट्रॅव्हल्स वरचा ताबा सुटल्याने झाले अपघात,ड्रायव्हर च्या चुकी मुळे मोठा अपघात

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
नागपुर:दिनांक २४/०४/२०२५ रोजी भिवापुर पोलीसांना माहीती प्राप्त झाली की, मानोरा शिवारात अपघात झालेला आहे. अशी माहीती प्राप्त होताच पोलीस तात्काळ घटनास्थळावर रवाना झाले. सर्वप्रथम पोलीसांनी अपघातात जखमी झालेल्या सर्वांना ग्रामीण रूग्णालय, भिवापूर येथे उपचारा करिता रवाना केले.सदर अपघाता बाबत अधिक चौकशी केली असता पोलीसांना अशी महीती प्राप्त झाली की,दिनांक २४/०४/२०२५ रोजी सकाळी अंदाजे ०८/३० वा.दरम्यान एम.एच ३७ बी ६९६४ कमांकाची श्री बाबा ट्रॅव्हल्स सिंदेवाही जि.चंद्रपुर येथून निघाली सकाळी अंदाजे १०/०० वा. चे दरम्यान मौजा मानोरा ता. भिवापूर शिवारात एम.एच ३७ बी ६९६४ ट्रॅव्हल्स चे चालक नामे सचीन नरेंद्र धकाते, वय ३१ वर्षे, रा. वार्ड क्र. ४, बाम्हणी, पोस्ट तळोधी (बालापूर) ता. नागभीड जि. चंद्रपूर याने आपले ताब्यातील ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवून अचानक ब्रेक मारल्याने चालकाचे वाहना वरिल नियंत्रण सुटुन संतुलन बिघडल्याने ट्रॅव्हल्स रोडच्या बाजुला असलेल्या नाल्यात पलटी झाल्याने ट्रॅव्हल्स मध्ये बसलेले १) प्रतिक ललीत गोवर्धन, वय २२ वर्ष रा. भिवापूर ता. भिवापूर जि. नागपूर २) उत्तम जानबाजी तांबे, वय ५५ वर्ष रा. शेगाव (सोमनाळा) ता. भिवापूर जिनागपूर ३) गजानन पुंडलीक मोरले, वय २५ वर्ष रा. ओवाळा ता. नागभीड जि. चंद्रपूर, ४) सुखदेव जनार्धन पात्रा, वय ६० वर्ष रा. चंद्रपूर जि. चंद्रपूर, ५) अरूणा रामकृष्ण चौधरी, वय ४० वर्ष रा. भिवापूर ता. भिवापूर जि. नागपूर, ६) स्नेहल भास्कर भंडारे, वय २५ वर्ष रा. गांगलवाडी ता. मूल जि. चंद्रपूर, ७) कु. सेजल बाळकृष्ण हलमारे, वय २० वर्ष रा. जवराबोडी ता. भिवापूर जि. नागपूर, ८) रोशन देवानंद सहारे,व. ४० वर्ष रा. चिमूर ता. चिमूर जि. चंद्रपूर हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना पुढील उपचार करीता नागपुर येथे हालविण्यात आले आहे सदर अपघातात १) श्वेता रमेश बळी, वय ३० वर्ष रा. वार्ड क्र. ७. शिवाजी चौक, नागभीड जि. चंद्रपूर २) नंदा उध्दव गुरनूले, वय ४५ वर्ष रा. सिंदेवाही ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर ३) साईनाथ पांडुरंग गावतुरे, वय ५० वर्ष रा. आमगाव (महाल) ता. चामोर्शी जि. गडचिरोली ४) श्रीराम काशीनाथ चट्टे वय ५० वर्ष रा. निलज ता. पवनी जि. भंडारा ५) बिना समर्थ वय ४० वर्ष रा. आमगाव ता. मूल जि. चंद्रपूर ६) सौ. शोभा रामभाऊ गुंतुकवार वय ५५ वर्ष रा. चनोर्शी जि. गडचिरोली ७) कु. सायली संजय पडोळे, वय २२ वर्ष रा. जावराबोडी ता. भिवापूर जि. नागपूर ८) राकेश ताराचंद मेश्राम, वय २२ वर्ष रा. जगताप (मांगली) ता. भिवापूर जि. नागपूर संजीवकुमार पानतावने वय २५ वर्ष रा. चामोर्शी जि. गडचिरोली १०) शोभा तुकडोजी रामटेके वय ८० वर्ष रा. गिट्टीखदान ता.जि. नागपूर ११) हर्षद सुरेश बांते वय १९ वर्ष, रा. जावराबोडी ता. भिवापूर जि. नागपूर १२) महेश मधुकर गोगल वय ३८ वर्ष रा. भुयार ता. पवनी जि. भंडारा १३) विशाल दयाराम नागपूरे वय २२ वर्ष रा. सोमनाळा ता. भिवापूर जि. नागपूर १४) ममता युवराज शेंडे, वय ३५ वर्ष रा. वाडी, नागपूर १५) सौ. सुष्मीता सुधाकर बारसागडे, वय ४५ वर्ष रा. पळसगाव (जाट) ता. सिंदेवाहि. चंद्रपूर १६) सुधाकर पंढरी बारसागडे, वय ५० वर्ष रा. पळसगाव (जाट) ता. सिंदेवाहि. चंद्रपूर १७) चंद्रभागा अर्जुनजी नागपूरे, वय ६० वर्ष रा. सोमनाळा ता. भिवापूर जि. नागपूर १८) वृषाली संजय पडोळे वय २० वर्ष रा. भिवापूर ता. भिवापूर जि. नागपूर १९) रेखाबाई आनंदराव सालीगांजे, वय ५० वर्ष रा. चामोर्शी जि. गडचिरोली २०) प्रियंका फतरू दिघोरे, वय २६ वर्ष रा. भिवापूर ता. भिवापूर जि. नागपूर २१) लावण्य लोमेश अंबादे, वय २० वर्ष रा. नागपूर २२) संजय वासुदेव सातपुते, वय ५० वर्ष रा. खंडाळा ता. चामोर्शी जि. गडचिरोली २३) लक्ष्मी संजय सातपुते, वय ४० वर्ष रा. चामोर्शी जि. गडचिरोली २४) कल्पना मनोज कवठे वय ४४ वर्ष रा. आठवा मैल, अमरावती रोड, नागपूर २५) रोहीत ताराचंद मेश्राम वय २४ वर्ष रा. मांगली (जगताप) ता. भिवापूर जि. नागपूर २६) शिवा कारू मेश्राम, वय २२ वर्ष रा. मांगली (जगताप) ता. भिवापूर जि. नागपूर २७) कवडू गणेश चौधरी, रा. निलज ता. पवनी जि. भंडारा २८) अनीता अनील इंगळे, वय ४२ वर्ष रा. भुसावळ जि. जळगाव २९) प्रतिभा रवी शिंदे, वय ४५ वर्ष रा. अमरावती जि. अमरावती ३०) रामभाऊ मारोती गुंट्टलवार, वय ६५ वर्ष रा. चामोर्शी जि. गडचिरोली ३१) सोमेश्वर भिकाजी कैकाडे, वय ४२ वर्ष रा. निलज ता. पवनी जि. भंडारा ३२) विशाल विश्वजीत मंडल वय २५ वर्ष रा. चामोर्शी जि. गडचिरोली ३३) मंगेश नामदेव सहारे वय ३० वर्ष रा. ओवाळा ता. नागभिड जि. चंद्रपूर ३४) नामे सौ. मिना साईनाथ गावतूरे, वय ४० वर्षे, रा. आमगाव (महाल) ता. चामोर्शी जि. गडचिरोली हे किरकोळ जखमी झाले आहे.पोलीस स्टेशन भिवापुर येथे चालक नामे सचीन नरेंद्र धकाते, वय ३१ वर्षे, रा. वार्ड क्र. ४, बाम्हणी, पोस्ट तळोधी (बालापूर) ता. नागभीड जि. चंद्रपूर याचे विरूध्द कलम २८१, १२५, १२५ (ए), १२५ (बी) भा.न्या.सं. २०२३ सहकलम १८४ मो.वा.का. अन्वये गुन्हा नोद करण्यात आला आहे.