वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करताना होत आहे अडचणी

Thu 24-Apr-2025,09:48 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, विधवा निवृत्ती वेतन, अपंग, वृद्ध व विधवा माता- भगिनींना दिले जाणारे मासिक निवृत्तीवेतन यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात सर्वांनाच मोठी अडचण येत आहे.गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र सरकारने प्रत्येकाला उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे प्रचंड हाल होत असून या कडक उन्हात तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. हा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन तहसील कार्यालय बल्लारपूर येथे देण्यात आले.यावेळी राजकुमार रामटेके,आसीफ हुसेन शेख, विकास भगत, सुरेश केशकर, मधुकर उमरे, भीमा पाटिल, मिथुन कवाड़े, रंजना सुपारे, बंडु मोड़क, साईनाथ सह आदी अपंग बांधव उपस्थित होते.