सोनार गल्ली मध्ये मारामारी करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या टोळक्यांवर कारवाई केली

अरबाज पठाण ( वर्धा )
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील PSI शरद गायकवाड, सोबत पोलीस हवालदार प्रशांत वंजारी शैलेश चापलेकर विजय पंच टिके, पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव असे खाजगी वाहनाने पो.स्टे.परिसरात पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की, काही युवक हे सोनार लाईन मध्ये आपसा आपसात वाद करून शांतता भंग करीत आहे अशा माहितीवरून तिथे जाऊन पाहिनी केली असता, तिथे शिवम राजेश दुबे व 26 वर्ष राहणार महादेवपुरा वर्धा व शुभम राजेश दुबे वय 24 वर्षे राहणार महादेवपुरा वर्धा यांची व राहील शेख मोहम्मद यासीन वय 24 वर्षे रामनगर वर्धा व त्याचा मावसभाऊ कुणाल रमेश गेडाम व 19 वर्ष राहणार रामनगर वर्धा वाद सुरू असून ते आपसी मारामारी करीत आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर इथे गुन्हा नोंदविण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, ठाणेदार पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात पोस्टफ वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील PSI शरद गायकवाड, सोबत पोलीस हवालदार प्रशांत वंजारी शैलेश चापलेकर विजय पंच टिके, पोलीस नाईक नरेंद्र कांबळे पोलीस शिवाय वैभव जाधव यांनी केली