पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या विरोधात बल्लारपूरमध्ये भाजपचे निदर्शने

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम, बल्लारपूर येथे २२ एप्रिल रोजी धर्माच्या आधारावर निष्पाप पर्यटकांना गोळ्या घातल्याच्या दुःखद घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांना त्यांच्या कुटुंबियांसमोर गोळ्या घालून २८ निष्पाप नागरिक मारले.त्या विरोधात २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता बल्लारपूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. रणंजय सिंग, काशिनाथ सिंग, शिवचंद्र द्विवेदी, महिला अध्यक्षा वैशाली जोशी, देवेंद्र वाटकर, गुलशन शर्मा, मनीष पांडे, घनश्याम बुरडकर, किशोर मोहूर्ले, माजी नगरसेवक वैशाली मोहूर्ले, कांता ढोके, राजू दासरवार, विक्की दुपारे, प्रकाश दोतपल्ली, बबलू गुप्ता, मोहित डांगोरे, सुरेंद्र खडका, कैलाश गुप्ता, अजय खोब्रागडे, रिंकू गुप्ता, छगन जुलमें, ॲड.शहा, मनीष पोलशेट्टीवार, सचिन उमरे, प्रशांत झामरे, राजकुमार श्रीवास्तव सह कार्यकर्ते उपस्थित होते. आणि इतर दोनशे कामगारांचे दोन मिनिटे श्रमदान झाले. मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिट मौन पाळण्यात आले तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.