उमरेड मॅरेथॉन स्पर्धेत पी.आर.डी.स्पोर्ट्स ब्रम्हपुरी चे विदयार्थी चमकले

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
उमरेड:- जागतिक आरोग्य दिनानिमित्त नगरपरिषद उमरेड व आई जगदंबा स्पोर्ट्स क्लब, उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने माजी वसुंधरा मॅरेथॉन स्पर्धा आज दिनांक ६ एप्रिल २०२५ रविवार ला सकाळी ७:०० वाजता देवरावजी इटणकर पब्लिक स्कूल ,उमरेड येथे आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉन स्पर्धेत मागील वर्षाची विजेती धावपटू कुमारी.आरुषी हेमंत फटिंग हिने विजयी परंपरा कायम राखत १० वर्षाआतील मुलींच्या १ कीमी. दौड स्पर्धेतप्रथम क्रमांक पटकाविला तर १० वर्षाआतील मुलांच्या गटात १ किमी. दौड स्पर्धेत कु. अर्पित हिवराज सोमनकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर कु.नक्ष महेश फटिंग याने पाचवा क्रमांक पटकाविला तसेच १२ वर्षा आतील मुलांच्या गटात २ किमी. दौड स्पर्धेत कु. जिशांत महेश फटिंग याने पाचवा क्रमांक पटकावला तर कु.मयुर रामकृष्ण ननावरे याने सहावा क्रमांक पटकाविला सर्व विजेत्या खेळाडूंना मेडल्स प्रमाणपत्र व रोख रक्क बक्षीस देण्यात आली विजेत्या खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय पालक व पी.आर.डी.स्पोर्ट्स,ब्रह्मपुरीचे संचालक व क्रिडा प्रशिक्षक राहुल जुआरे सर यांना दिले.