सचिन वैद्य यांना राज्यस्तरीय 2025 चा आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

Wed 23-Apr-2025,09:20 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बख्श हिंगणघाट

समाजभूषण, पत्रकारिता आणि साहित्यभूषण अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांना सात जणांचा गौरव

प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतच असावे:संमेलनाध्यक्ष प्रा.संचित कांबळे यांचे वक्तव्य

वर्धा:अव्यक्त अबोली बहुउद्देशिय संस्था पुलगाव द्वारा संस्थेचे आठवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आणि पुरस्कार सोहळा तथा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.निमित्त होते अव्यक्त अबोली बहुउद्देशीय संस्थेच्या आठव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.संचित कांबळे कोल्हापूर होते,तर उद्घाटक म्हणून हेमंत कांबळे या मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत रासपल्ली चीफ मॅनेजर पॉवर ग्रीड देवली स्वागताध्यक्ष आणि आयोजक म्हणून कपिल कलंभे देवळी यांनी जबाबदारी स्वीकारली.संमेलनात सर्वप्रथम उत्कृष कार्य करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कृत करण्यात आले.त्यात राज्यस्तरीय साहित्यभूषण,राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार व नंदिनी मनोहर शहारे यवतमाळ,राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार समाजसेवक सचिन निर्मला जगणराव वैद्य देवळी यांना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगार पॉवर ग्रीड देवली मेन्टेनन्स वर्क म्हणून धीरज इंगोले देवली तर आशिष भानारकर वर्धा तसेच सुनील मानकर देवली यांना सुद्धा पुरस्कारीत करण्यात आले.दुसऱ्या सत्रात संस्था अध्यक्षा जयश्री चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.तर निवेदन प्रांजली काळबेंडे यांनी केले.तिसऱ्या सत्रात एकांकिका सादरीकरण करण्यात आली.यामध्ये स्वराली वाणी कारंजा लाड यांनी माऊली विषयावर आधारित एकपात्री प्रयोग सादर केला.आणि मंगला भोयर यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग सादर केला.त्यानंतर कवीकट्टा सत्रात प्रांजली काळबेंडे वसई यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. यात नागोराव सोनकुसरे काका,आशा कांबळे,मंगला भोयर,प्रवीण काळबेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.संमेलनासाठी संयोजक म्हणून राजेश पोफारे,प्रवीण भगत,सुषमा कलंभे,सुमित राठोड,दिलीप थूल,दिलीप काळे,दीपांश कलंभे,यथार्थ कलंभे,संस्था सचिव योगेश ताटे यांचे सहकार्य लाभले.