नागपुर ग्रामीण जिल्हयात खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध अग्निशस्व बाळगणारे पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
नागपुर:खापरखेडा दिनांक २६/०४/२०२५ रोजी अनिल मस्के, उपविभागिय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक सावनेर यांना गुप्तबातमीदारा मार्फतीने माहीती प्राप्त झाली की, सावनेर मधील गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे आशिष उर्फ गुल्लू राजबहादूर वर्मा, वय २५ वर्षे, वार्ड नं. ३ चनकापूर हा वलनी येथील अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग च्या घरी हजर असुन त्यांच्या कडे अग्निशस्त्रे आहे. अशी माहीती प्राप्त होताच अनिल मस्के यांनी तात्काळ सदर माहीती रमेश धुमाळ,अपर पोलीस अधिक्षक,नागपुर ग्रामीण यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनात अनिल मस्के यांनी सदर माहीती श्री संतोष गायकवाड उपविभागिय पोलीस अधिकारी, कन्हान याना देवुन केळवद पोलीसांचे एक पथक तयार करून रवाना केले. संतोष गायकवाड यांनी सुध्दा उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय कन्हान येथील अंमलदाराचे पथक तयार केले. उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान यांचे पथक केळवद चे प्रभारी अधिकारी अनिल राउत, सहा. पोलीस निरीक्षक आणि पथक असे घटनास्थळी आरोपी अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग याचे घरी वार्ड क ३ वलनी येथे पोहचले. पोलीसांना पाहुन आरोपी अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग यांने उडवाउडवीची उत्तरे दिली.माहिती प्रमाणे त्याच्या घरी पाहीजे आरोपी नामे आशिष उर्फ गुल्लू राजबहादूर वर्मा आणि गब्बर दत्तूजी जुमळे, वय ३० वर्षे, रा. वार्ड नं. ३ वलनी हे मिळून आले. आरोपीतांनी पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांनी शित्ताफितीने तिन्ही आरोपीतांना पकडले. तिन्ही आरोपीजवळ प्रत्येकी एक अग्निशरव मिळुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष आरोपी आशिष उर्फ गुल्लू राजबहादूर वर्मा याच्या ताब्यातुन एक अग्निशस्त्र माउजर आणि एक मोबाईल आणि सिम जप्त केले.आरोपी नामे गब्बर दत्तूजी जुमळे याच्या ताब्यातुन एक अग्निशस्त्र माउजर जप्त केले. आरोपी नामे अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग याच्या ताब्यातुन एक अग्निशम्त्र माउजर आणि मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले.आरोपीच्या घरझडतीमध्ये दोन देशी बनावटीचा कट्टे ३६ जिवंत काडतुसे,२ रिकाम्या पुगळी ६ अँड्रॉईड फोन आणि १०२८.०५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा सदृश्य वनस्पती व ईतर साहीत्य मिळुन आले.सदर कारवाई मध्ये पोलीसांनी ५ अग्निशस्त्रे, ३६ जिवंत काडतुसे, २ रिकाम्या पुगळी, ८ अॅड्रॉईड फोन, सिमकार्ड आणि १०२८.०५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा सदृश्य वनस्पती व ईतर साहीत्य असा एकुण २,७१,८०० रु किंमती चा मुद्देमाल जप्त केला.आरोपी नामे १) आशिष उर्फ गुल्लू राजबहादूर वर्मा, वय २५ वर्षे, वार्ड नं. ३ चनकापूर, २) अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग, वय २९ वर्षे, रा. बलनी, ३) गब्बर दत्तूजी जुमळे, वय ३० वर्षे, रा. वलनी यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन खापरखेडा येथे कलम ३,५,२५ भारतीय शस्त्र अधिनियम सहकलम ८ (सी), २० (बी) (२), २९ एन.डी.पी.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.