उन्हाच्या तडाख्याने पशुपक्ष्याचे जीवन धोक्यात-देवानंद दुमाने

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:सध्या संपुर्ण भारतात तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्यावर उंचांक गाठत असल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याची झळ नागरिकासोबतच पशु पक्षाच्या आरोग्यावर पडत आहे. या उन्हाच्या तीव्रतेने केवळ माणूसच नव्हे तर पशुपक्षी देखील बेहाल झाले आहेत. अनेक ठिकाणच्या विहिरी,नाले,तलाव यातील पाणी आटू लागल्याने पशुपक्ष्यांना पाण्याच्या शोधात मनुष्यवस्तीकडे धाव घ्यावी लागते आहे.परंतु पाण्याअभावी पशु पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे पशु पक्ष्यांच्या जीवनावर उन्हाच्या तीव्रतेचा विपरीत परिणाम होत आहे.पाण्याअभावी पशु पक्षी आजारी पडत असल्याचे दिसून येत आहे.वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पशु पक्षी यांची काळजी घेणे नागरिकांचे कर्तव्य आहे. पाण्याच्या किंवा अन्नाच्या शोधात आलेल्या पशु पक्ष्यांसाठी मूठभर धान्य व घोटभर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा पशु पक्षी हे निसर्गातील अनमोल ठेवा असल्याने त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.निसर्गातील समतोल राखण्याकरिता पशु पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. पशु पक्षी टिकतील तरच निसर्ग टिकेल अन्यथा त्याचे वाईट परिणाम येत्या काळात मानवजातीला भोगावे लागतील पशु पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या घरातील बाल्कनीत, अंगणात,झाडावर,गच्चीवर योग्य त्या प्रमाणात पाण्याची व अन्नाची सोय पक्ष्यांसाठी करावी .पशु पक्ष्यांचे दर्शन पुढील पिढीला घडविण्यासाठी आपले एक पाऊल पुढे करावे असे आव्हान आरमोरी येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने यांनी केले आहे.