वर्धेत ५ उमेदवारांचा निवडणुकीतून माघार १६ उमेदवार रिगणात

Mon 04-Nov-2024,05:27 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि:अथर शेख वर्धा

वर्धा:वर्धा Wardha election विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या ५ नेत्यांनी आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडूकीतून माघार घेतली. त्यामुळे आता वर्धा विधानसभेत १६ उमेदवार रिंगणात आहेत.

वर्धा विधानसभा मतदार संघात प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह २७ जणांनी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समीर देशमुख, सुधीर पांगूळ, सतीश आडे, रेणुका कोटबकर यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे वर्धेत १६ उमेदवार रिगणात आहेत. Wardha election यात भाजपा महायुतीचे आ. डॉ. पंकज भोयर, काँग्रेस महाविकास आघाडीकडून शेखर शेंडे, अपक्ष डॉ. सचिन पावडे अशी तिहेरी लढतीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे.