बैलगाडीतून नवागतांचे स्वागत गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा उपक्रमाने आली रंगत

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
आमगाव: दिनांक ३० मार्च २०२५: गुढीपाडव्याच्या मंगलमय वातावरणात जिल्हा परिषद गोंदियाच्या " गुडीपाडवा - शाळा प्रवेश वाढवा" या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा काळीमाती येथे पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. या निमित्ताने बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले होते.कार्यक्रमाची सुरुवात गुढी उभारून, दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने पुष्पगुच्छ देवून, ढोल ताश्याच्या गजरात बैलगाडीतून शाळेत आणण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या स्वागताने लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.मुख्याध्यापकांनी शाळेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी स्वागतपर गाणी व नृत्य सादर करून वातावरण अधिक रंगतदार केले. ठीकठिकाणी पालकांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक व स्वागत केले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,फळे आणि शुभेच्छा देण्यात आल्या. " गुडी पाडवा - शाळा प्रवेश वाढवा" या उपक्रमामुळे शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, हा स्वागत समारंभ नव्या विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतच्या सरपंचा शीला पुरुषोत्तम चुटे,ग्रामपंचायत सदस्य होमेंद्र खोब्रागडे व सर्व सदस्यगण ग्रामपंचायत काळीमाती,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार मेहर उपाध्यक्षा योगिता संजय मुनेश्वर, सदस्य कविता कवींद्र फुंडे, त्रिवेणी रमेश सिंद्राम, वंदना छेदीलाल पाथोडे, सोमेश्वर कोरे, लखनलाल गिर्हेपुंजे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक जी.टी रहांगडाले, शिक्षक आनंद सरवदे, एम, एम. डोबनेउके, एन. जी. कांबळे, एम एम हरिणखेडे, डी के मेंढे,के जी महादुले,दुर्गा मेहर, वैशाली ऊके यांच्यासह पालक उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी तारा तरोणे,मीरा फुंडे,चारुलता महारवाडे, रोहित चुटे,अनिकेत चुटे, दिलीप तरोने, गजानन भांडारकर,आदित्य चुटे,अनिकेत रहांगडाले, विनय कोरे, मयूर भांडारकर यांच्यासह पालक वर्गांनी सहकार्य केले.