उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंद्रपुरात प्रचारसभा आज

Fri 08-Nov-2024,09:12 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

चंद्रपूर:चंद्रपूर विधानसभेचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, शनिवारी ( दि. ९ नोव्हेंबर ) चंद्रपूर दौऱ्यावर येत आहे. सकाळी दहा वाजता दादमहल येथील कोहिनूर तलाव क्रीडांगण येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

विधानसभेच्या मतदानाची तारीख जवळ येताच सर्व पक्ष कामाला लागले असून, सर्व उमेदवारांनी प्रचारात उडी घेतली आहे. यात भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातही त्यांनी छोट्या बैठका, नागरिकांशी संवाद अशा माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.