ठाणेदार प्रफुल डाहुले यांना केले सन्मानित
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर्
वर्धा:देवळी या विधानसभा निवडणुक बंदोबस्ताच्या अनुषंगाने परिसरामध्ये अल्लीपूर गावामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी जबाबदारी सांभाळली. उत्कृष्ट बंदोबस्त लावून कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्यामार्फत येथील ठाणेदार प्रफुल डाडुले यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पुलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या उपस्थितीत प्रशस्तिपत्र देऊन ठाणेदार प्रफुल डाहले यांचा सन्मान करण्यात आला.