अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद रामटेक पोलीसांची कारवाई

Fri 28-Mar-2025,09:08 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर

नागपुर:रामटेक पोलीस स्टेशन रामटेकः दिनांक २७/०३/२०२५ रोजी रामटेक पोलीस, पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदयांवर कारवाई करणे कामी रात्री पेट्रोलींग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा चाचेर सांड नदिच्या पात्रातुन ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी नगरधन ते चाचेर रोडवर दत्तात्रय हायस्कूल येथे नाकाबंदी केली असता संशयीत सोनालीका कंपनीचे ट्रक्टर क्रमांक एम एच २९ ए.के. ३५८५ त्याला जोडुन असलेली विना क्रमांकाची ट्रॉली सह मिळुन आले आणि स्वराज कंपनीचे ट्रक्टर व ट्रॉली दोन्ही विना क्रमांकाचे असलेले मिळुन आले. दोन्ही वाहन थांबवुन वाहन चालकाला नाव पत्ता विचारला असता, सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टरचा चालक नामे रोशन धर्मराज बावनकुळे, बोरकर, वय ३१ वर्षे, रा. हनुमान मंदीरा जवळ ता. मौदा जि. नागपूर आणि स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर चालकाचे नाव, पत्ता विचारला असता राजु महादेव हटवार, वय ४९ वर्षे, रा. खंडाळा रोड चाचेर ता.मौदा जि. नागपूर अशी माहीती प्राप्त झाली.दोन्ही वाहन चालकांना परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्या कडे परवाना नसल्याचे सांगितले वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली पोलीसांनी पंचासमक्ष सोनालीका कपनीचा ट्रॅक्टर मधुन १) ०१ ब्रास रेती किंमती ६,०००/रूपये आणि २) सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर एम एच २९ ए.के. ३५८५ ट्रॉली सहीत किंमती ६,००,०००/- रूपये ३) स्वराज कंपनीचे ट्रक्टर मधुन ०१ ब्रास रेती किंमती ६,०००/- रूपये आणि ४) स्वराज कंपनीचे ट्रक्टर ट्रॉली सहीत किंमत्ती ६,००,०००/- रूपये ५) घमेले,पावडे असा एकुण १२,१४,०००/- रूपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.सदर प्रकरणी नमुद दोन्ही आरोपीता विरूध्द पोस्टे रामटेक येथे कलम ३०३(२), ४९(२) भा.न्या.सं. सहकलम ४८ (७) ४८(८) म.ज म सहीता सहकलम ४,२१. खान खनिज सह कलम ५०,१७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.