ब्रम्हपुरी क्रिडा महोत्सव समीतीने जिंकली उमरेड मॅरेथॉन स्पर्धेची चॅम्पियनशिप.

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
पी.आर. डी. स्पोर्ट्स, लक्ष्य फिजिकल अकॅडमी, भारत स्पोर्ट्स फिजीकल अकॅडमी यांचा सहभाग
उमरेड:- आज दिनांक २७/४/२०२५ ला सकाळी ६:३० वाजता संत संताजी जगनाडे महाराज चौक,उमरेड येथे ओम साई स्पोर्ट्स क्लब , उमरेड द्वारा आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत ब्रम्हपुरी क्रीडा महोत्सव समिती च्या विद्यार्थ्यानी उत्कृष्ठ कामगिरी करत विवीध गटात क्रमांक पटकावित ब्रम्हपुरी शहराचे नाव लौकीक केले आहे ज्यामध्ये १३ वर्षातील मुलींच्या गटात १ किमी अंतराच्या दौड स्पर्धेत कुमारी आरुषी हेमंत फटिंग हीने चौथा क्रमांक पटकाविला तर कुमारी. मानसी शेखर फटिंग हीने सहावा क्रमांक पटकाविला तर कुमारी. श्वेता विष्णु पिलारे हीने आठवा क्रमांक पटकाविला तसेच १३ वर्षातील मुलांच्या गटात १ किमी अंतराच्या दौड स्पर्धेत नेवजाबई भैया हितकारणी विद्यालय, नवेगाव पांडव येथील विदयार्थी कुमार. पंकज भेंडारकर याने पाचवा क्रमांक पटकावला तर महिलांच्या ओपन गटात कुमारी. किरण बांडे हीने दहावा क्रमांक पटकाविला सर्व विजेत्या खेळाडूंना मेडल्स, रोख देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले सर्व विजेत्या खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय पालक व ब्रम्हपुरी क्रिडा महोत्सव समिती चे पदाधिकारी राहुल जुआरे , प्रफुल नागपुरे, विहार मेश्राम, देवा मिसार , महेन्द्र मने,अनुप पिपरे यांना दिले याप्रसंगी ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव समितीचे पदाधिकारी साहिल झुरे, हिमांशू गेडाम ,प्रिया ठाकरे,पूजा बानबले, काजल दुफारे उपस्थित होते.