गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे आरमोरीत जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:आरमोरी :- महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन च्या सूचनेनुसार अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री संघाची निवळ चाचणी चे आयोजन गडचिरोली जिल्ह्या अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे दिनांक .२२ डिसेंबर २०२४ रविवार ला, सकाळी ७:०० वाजता आरमोरी येथील वडसा रोडवरील टी.सी.सी. ग्राऊंड येथे आयोजित करण्यात येणार आहे सदर स्पर्धा चार गटात घेण्यात येणार ज्यामध्ये ' अ ' गट ओपन गटातील पुरुष व महीलांना १० किमी अंतर तर २० वर्षातील 'ब' गटातील खेळाडूंचा जन्म दिनांक १३/१/२००५ पासून ते दिनांक १२/१/२००७ पर्यंत असेल व पुरुष गटाला ८ तर महिला गटाला ६ किमी दौड राहील तर १८ वर्षाआतील 'क ' गटातील मुले व मुलींच्या गटात जन्म दिनांक १३/१/२००७ पासून ते दिनांक १२/१/२००९ पर्यंत असेल व या गटातील खेळाडूंना ६ किमी अंतर दौड राहील तर १६ वर्षाआतील 'क ' गटातील खेळाडूंचा जन्म दिनांक १३/१/२००९ पासून ते दिनांक १२/१/२०११ पर्यंत राहील व सदर गटातील खेळाडूंना २ कीमी. अंतर दौड राहील सदर स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एएफयुआयडी नंबर बंधनकारक राहील सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर ८९९९१९५०७० व क्रीडा संयोजक राहुल जुआरे सर ८६५७७७०८४५ यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांकवर संपर्क करण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.