शेतकरी आंदोलनाची प्रशासनास धास्ती तातडीने बोलावली शिष्ट मंडळाची बैठक

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा
वरोरा :- दि. 10 मार्च सोमवार ला शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन वरोरा येथील रत्नमाला चौकात राष्टीय महामार्ग रोखून धरणार असे शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी प्रशासनास एका पत्रा द्वारे माहिती दिली , त्या पत्रा अनुषंगाने दिनांक 5/3/2025 ला पोलीस निरीक्षक साहेब वरोरा यांच्यामार्फत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक लावण्यात आली होती, या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून शेतकरी शिष्टमंडळाला कळविण्यात आल्या की, आमच्या वतीने सर्व विभागांना पत्र व्यवहार केलेला आहे त्यामुळे तुम्ही हे आंदोलन थांबवावे, तसेच दिनांक 7/5/2025 ला निवेदनातील विषयावर संबंधित विभागातील अधिकारी यांना बोलावून तहसीलदार यांच्या अध्यक्षते खाली शेतकरी शिस्ट मंडळाची आढावा बैठक लावण्यात आली मात्र संबंधित विभाग यांच्या कडून शेतकरी शिष्टमंडळ यांना असे कळविण्यात आले कि निवेदनातील सर्व विषय हे कॅबिनेट मंत्री चे असल्यामुळे संबंधित विषयावर आम्ही तोडगा काढू शकत नाही असे म्हणणे संबंधित विभागाचे पडले त्यामुळे शेतकरी जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, शेतकऱ्यांच्या या ठाम भूमिकेवर प्रशासन काय करणार आहे या आढावा बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सचिव चंद्रसिंग शिंदे,तालुका कृषी विभागाकडून डोईफोडे मॅडम, वीज वितरण कंपनीकडून उपविभागीय अभियंता बदकल , तर सहाय्यक उपनिबंध म्हणून दिवसे साहेब तर शेतकरी शिष्ट मंडळ म्हणून शेतकरी नेते किशोर डुकरे,शेतकरी तुकाराम निब्रड,मनोज काळे, तुलसी आलम,अरविंद झाडे यादी शेतकरी हजर होते.