इंदिरानगर डोंगरी सहित शहरातील पाणी टंचाई चे निराकरण करा अन्यथा आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगर परिषद प्रशासनाला निवेदनातून इशारा
गडचिरोली:आरमोरी शहरातील इंदिरानगर डोंगरी सहित इतरही भागात निर्माण झालेल्या पाणी टंचाई चे तात्काळ निराकरण करा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केले आहे.आरमोरी शहरातील इंदिरानगर डोंगरी हि जवळपास दिड ते दोन हजार लोकांची वस्ती आहे. त्या भागात नळयोजना कुचकामी आहे. काही बोरवेल वरून सौरपंपाच्या माध्यमातून सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेद्वारे दिवसातून अर्धा तास सुद्धा पाणी पुरवठा होऊ शकत नाही. बोरवेलचे हातापम्प निकामी झालेले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना भीषण पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे. एवढं असतानाही संवेदनहिन असलेल्या नगर परिषद प्रशासनाद्वारे टँकर ने सुद्धा पाणी पुरवठा केल्या जात नाही.त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांच्या निर्देशानुसार तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्या कल्पना तिजारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हा कार्याध्यक्षा रुषाली भोयर यांच्या नेतृत्वात नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.इंदिरानगर डोंगरी सहित आरमोरी शहरातील इतरही भागातील पाणी टंचाईचे निराकरण करा अन्यथा नगर परिषद प्रशासनाविरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदनातून देण्यात देण्यात आले आहे. येत्या आठवडा भरात पाणी टंचाई वर तोडगा काढण्याचे आश्वासन नगर परिषद मुख्याधिकारी माधुरी सलामे, प्रशासन अधिकारी प्रितेश काटेखाये, पाणी पुरवठा अधिकारी प्रणाली दूधबळे यांनी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या तालुका अध्यक्षा संगीता मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर उपाध्यक्ष प्रफुल राचमलवार,शहर सरचिटणीस राकेश बेहरे, सुनील बांगरे, नरेश हिरापुरे, शहर सचिव प्रशांत मोगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष प्रवीण पोटेकर, शुभांगी गराडे, भूमिका बागडे, राजू किरमे, शुभांगी रामटेके, ललिता भोयर, मनीषा वाकडे, मनीषा कानतोडे, कल्पना पोटेकर,, भामा बारसागडे, निर्मला कांबळे, छाया चौके, मुक्ता चौके, सोनी चौके, शुभांगी दुमाने, मुक्ता जुवारे, वच्छला कांबळे, ज्योती चौके, सुनीता शिवूरकर,शेवंता खोब्रागडे,गुड्डी दुमाने उपस्थीत होते.