वर्धा शहर डीबी पथकाची कामगिरी मोटर सायकल चोरी करणारी टोळी गजाआड मोटर सायकल चोरीचे दहा गुन्हे केले उघड

अरबाज पठाण ( वर्धा )
पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीत मोटरसायकल चोरी संबंधाने पोलीस स्टेशन वर्धा शहर चे ठाणेदार श्री पराग पोटे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे व त्यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड सोबत पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी रामनवमी चे दिवशी चोरी गेलेल्या मोटरसायकल संबंधाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तर त्यांना सदर चोरटे हे मसाळा हद्दीतील असल्याची गोपनीय माहिती मिळाली तसेच त्यांनी चोरी केलेल्या मोटरसायकल या अमरावती जिल्हा येथे एका गावात ठेवल्याचे समजले, त्यावरून मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील डीबी पथकाने काशीखेड तहसील धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे जाऊन अक्षय उर्फ गौरव पद्माकर काळे व 26 वर्ष राहणार काशीखेड याला ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने तीन मोटरसायकल वर्धा बाजारातून रामनवमीच्या दिवशी त्याचा आते भाऊ शुभम फुलझ ले याच्यासह चोरी केल्याचे सांगितले तसेच त्यापैकी एक मोटर सायकल आरोपी अमोल कैकाडी याच्या हाताने नेर जिल्हा यवतमाळ येथे विकण्याकरता पाठवल्याचे सांगितले त्यावरून तेथे चोरी गेलेली मोटरसायकल व आरोपी अमोल कैकाडी याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता सदरच्या मोटरसायकल हि अक्षय काळे व त्याचा आते भाऊ शुभम फुलझले यांनी चोरी करून मला विकण्याकरता दिल्याचे सांगितले त्यावरून अमोल कैकाडी व अक्षय काळे यांच्यासह वर्धेला येऊन साईनगर मसाळा येथून शैलेश मधुकरराव फुलझले व शुभम मारोतराव हातेकर याला ताब्यात घेऊन वरील चारही आरोपी यांना अटक करून मा. न्यायालयातून पीसीआर प्राप्त करून त्यांना विचारपूस केली असता आरोपी क्रमांक 1) शैलेश मधुकरराव फुलझले वय 26 वर्ष राहणार साईनगर मसाळा यांनी त्याचा मामेभाऊ आरोपी क्रमांक 2) अक्षय उर्फ गौरव पद्माकर काळे व 28 वर्ष रा. काशीखेड तहसील धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती यांच्या मदतीने दिनांक 6/4/ 2025 रोजी वर्धा मार्केट परिसरातून 1) एक पॅशन प्रो लाल रंगाची क्रमांक एम एच 32 यु 6७९८ कि. 20,000 रुपये 2) एक रंगाची फॅशन प्रो क्रमांक एम एच 32 टी 6899 कि. 11,000 रुपये 3) एक पांढऱ्या निळ्या रंगाची फॅशन प्रो एम एच 31 डी एल 7923 कि. 50,000/ रुपये या चोरी केल्याचे समजले तसेच आरोपी शैलेश फुलझेले यांनी एक लाल रंगाची एक्टिवा क्रमांक एम एच 32 झेड एम एस 32 झेड 5532 कि. 10,000 रुपये धामणगाव रेल्वे जीआरपीएफ पोलीस स्टेशन हद्दीतून तसेच एक काळा रंगाची फॅशन एम एच 32 व्ही 9207 कि 30,000 रुपये हि सन 2024 चे आंबेडकर जयंतीच्या दिवशी चोरी केल्याचे तसेच एक बजाज डिस्कवर एम एच ३२ S. 7925 कि, 30,000 रुपये रेल्वे स्टेशन वर्धा चे समोरून चोरी केल्याचे सांगितले. तसेच आरोपी नामे शुभम महादेवराव हातेकर राहणार साईनगर मसाळा यांनी सरकारी दवाखाना इथून वर्धा येथून एक स्प्लेंडर एम एच 32 ए क्यू 3041 कि, 30,000/रुपये हनुमान नगर वर्धा येथून एक होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच 32 ए ए 2036 किंमत 15000/ रुपये तसेच नागपूर येथून वेगवेगळ्या परिसरातून एक होंडा शाईन एम एच 40 बी व्ही 35 12 व एक होंडा पॅशन एम एच 31 डी 69 42 किंमत 55000 / रुपये चोरी केल्याचे सांगितले वरील सर्व 9 मोटरसायकलवर व 1 मोपेड गाडी या वरील आरोपीतांपासून काशीगड जिल्हा अमरावती ग्रामीण तसेच साईनगर मसाला परिसरातून एकूण किंमत 2,91,000 कृपया चा माल जप्त करण्यात आला. सदरची विशेष कामगिरी ही माननीय पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या निर्देशाप्रमाणे ठाणेदार पराग पोटे पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, सोबत पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली