बल्लारपूरात बाबासाहेब आंबेडकरांना ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्त्व , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बल्लारपूरातिल कार्यालय,शाळा,संघटना,राजकीय नेते व पदाधिकारी तसेच शहरातील नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रात्रीच्या सुमारास मुख्य मार्गाने कॅडल मार्च काढून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बल्लारपूर शहरातील वार्डावार्डात बुद्धविहारमध्ये महामानवाला अभिवादन करून बुद्धवंदना घेण्यात आली.त्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरीता लहान मुले, महिला, युवक यांच्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक सफेद वस्त्र परिधान करून तर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एकवटले होते. सायंकाळी हजारो भीमसैनिक शहराच्या वेगवेगळ्या भागातून मिरवणुकीने बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन मेणबत्ती लावून नतमस्तक लावून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. दिवसभर येथे अनुयांची रेलचेल होती.
प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली -
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल कापगते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी एक वही एक पेन आंबेडकरी युथ तर्फे विद्यार्थ्यांकरीता राबवित असलेल्या उपक्रमाची प्रसंशा केली. नगर परिषद बल्लारपूर तर्फे उपमुख्याधिकारी संगीता उमरे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी नगर परिषदचे योजना अधिकारी अक्षय राऊत, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते, साठा प्रमुख धामनगे, कर निरीक्षक मोनाली वांढरे, सुशीला पावडे, सुमित मोरे, किशोर डाखरे, वर्षा जांभूळकर सहअधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांच्या उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सर्वप्रथम उपस्थित काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करण्यात आले. यावेळी माजी गटनेते देवेंद्र आर्य, इस्माईल ढाकवाला, नरसिंह रेब्बावार, नाना बुंदेल, भास्कर माकोडे, अनिल खरतड, मेघा भाले, रेखा रामटेके, नरेश आनंद, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी तर्फे चंदेल सिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांचे हस्ते बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, सतविंदर सिंग दारी, समीर केने, विकास दूपारे, राजू दासरवार सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील वार्डवार्डातून यज्ञ वाहिली.