शिवसेना (शिंदे गट) भव्य पक्षप्रवेश संपन्न
अब्दुल कदीर बख्श ( हिंगणघाट )
विधानसभा २०२४ च्या निवडणुकांमध्ये चारही विधानसभेत शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांनी - पदाधिकाऱ्यांनी महायुती मध्ये विजयासाठी मोलाची भूमिका बजावली. विधानसभा निवडणूक संपतात संपूर्ण वर्धा जिल्ह्यात शिवसेनेमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातल्या त्यात हिंगणघाट - समुद्रपूर विधानसभेमध्ये शिवसेना पुन्हा ताकतीने मजबूत होताना दिसत आहे.
शनिवार दिनांक ०७ डिसेंबर दु. १:०० वाजता शिवसुमन मंगल कार्यालयामध्ये शिवसेना (महिला आघाडी) पक्षात भव्य पक्षप्रवेश संपन्न झाला. सौ. सुनिता तांबोळी यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. त्याचप्रमाणे हिंगणघाट शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे नेते राजू हिंगमिरे यांनी देखील आपल्या सर्व सहकार्यांसोबत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशाला विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मानलेल्या भगिनी सौ.शुभांगी नांदगावकर यांनी उपस्थित राहून पक्षप्रवेश करणाऱ्या महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश ईखार यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. वंदना भुते, उपजिल्हाप्रमुख रवी धोटे,युवा सेना जिल्हाप्रमुख महेश मुडे, शिवसेना पदाधिकारी आतिश सातपुते,राहुल टेंभुर्णे, इत्यादी उपस्थित होते. पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रशांत लहामगे, शहर संघटक अमित काळे यांनी केले.