आरोग्य समिती सभा सुरेश हर्षे उपाध्यक्ष जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती यांच्या अध्यक्षते मध्ये सभा पार पडली

Tue 04-Mar-2025,11:57 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

गोंदिया जिल्ह्यांतील प्रमुख्याने उपस्थित *मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम, रुपेश कुथे, भूमेश्वर पटले,सुधाताई रहांगडाले, छायाताई नागपुरे, गीता नागपुरे,वैशाली पंधरे, .डॉ.नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.अभिजीत गोंधळे जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ.महेंद्र कुमार धनविजय, डॉ.अरविंद कुमार वाघमारे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, रोशन राऊत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, डॉ. निरंजन कुमार अग्रवाल जिल्हा साथ रोग अधिकारी, विनोद कुमार चव्हाण जिल्हा साथ रोग अधिकारी बैठकीत सुरेश हर्षे यांनी आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा कशी चांगल्या प्रकारे देता येईल व वेळीच उपचार व्हावं या दृष्टीकोनातून खालील प्रमाणे सुरेश हर्षे यांनी सभेला उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश दिले व खालील मुद्द्याप्रमाणे त्वरित अंमलबजावणी करावी असे सूचवले.1.प्राथमिक आरोग्य केंद्रांना चांगली सेवा देण्याच्या हेतूने सीसीटीव्ही लावणे 2. प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र आयुर्वेदिक डिस्पेंसरी कर्मचारी अधिकाऱ्यांनी शासकीय कामाकरिता हलचल रजिस्टर ला नोंद करूनच जावे. 3.प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय कामाला जाताना पर्याय व्यवस्था करूनच जाणे अनिवार्य.4.रुग्ण कल्याण समिती सभा प्रत्येक महिन्याला व्हावी जेणेकरून जनप्रप्रतिनिधी सोबत समन्वय साधून वेळीच परिसरातील रुग्णांच्या अडी-अडचण दूर करता येतील.5 .गरोदर माता व जननी माता यांची निधी सन 2017 ते 23 पर्यंतची लाभार्थ्यांना त्वरित लाभ द्यावे व यादी पूरवावी.6 एकाच वैद्यकिय अधिकार्‍यापाशी दोन प्रा.आ.के.चे प्रभार असल्यास कमी करून दुसऱ्या अधिकाऱ्यांना सोपवावे. 7. जिल्ह्यातील प्प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हास्तरावरून औषध पुरवठा वाहनांनी औषध पुरवठा करावी 8. सुरळीत सेवा देण्याच्या हेतूने प्रा. केंद्र व आरोग्य स्वस्थेतील कर्मचाऱ्यांमध्ये असलेले वाद संपवावे. 9. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र प्रस्तावित गावांची प्रस्ताव शासनास मंजुरी करिता त्वरित पाठवा.10 जिल्ह्यातील जी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहेत त्या केंद्रांना त्वरित अनुदान मिळावं याकरिता त्वरित मागणी करावी व पाठपुरावा करावा.11. तालुका वैद्यकीय अधिकारी प्रा.केंद्र अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी व जि. प .सदस्यांनी आरोग्य संस्थेला भेटी वाढवावे.12. जिल्ह्यातील सहा महिने आधीचे व आजच्या ओपीडीचे आकडे पुढच्या च्या सभेला सादर करावे व ओपीडी वाढवावी.13.डिलिव्हरी महिलांना रेफर टू गंगाबाई न करता शक्य तेवढं वरिष्ठ डॉक्टरांना प्राचारण करून किंवा सल्ला घेऊन बाळंतपण कराव.14. नवीन मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र करिता वन विभागाची जागा हस्तांतरित करण्याकरिता ग्रामसभेचे ठराव व प्रस्ताव त्वरित सादर करा.15 .औषधीच्या तुटवडा होऊ नये व वेळीचे औषध पुरवठा व्हावे याकरिता वैद्यकीय अधिकारी व जनप्रतिनिधी यांनी पण लक्ष ठेवावे.16. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्ण कल्याण समितीचे सदस्यांचे नावा मोबाईल नंबर ची फलक लावावे.