बस ऑटो अपघातात ऑटो चालक गंभीर जखमी,चंद्रपूर मुख्य बसस्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळ घडली घटना

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : शहरातील मुख्य बसस्थानकात बसची धडक बसल्याने ऑटोचालक गंभीर जखमी झाला. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज रविवारी दुपारी १२. १० च्या सुमारास घडली. नानाजी मेश्राम (५७) रा. बाबूपेठ चंद्रपूर असे गंभीर जखमी ऑटोचालकाचे नाव आहे.चंद्रपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने राज्यातील अनेक शहरातून नियमित बस वाहतूक असते.त्यामुळे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून १२. ०७ कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांनी सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले आहे.बसस्थानकाच्या बाहेर वाहने उभी करून तेथून प्रवासी उचलण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ऑटो स्टँड बांधले आहेत.या ऑटो स्टँडमध्ये ऑटोचालक आपली वाहने उभी करतात आणि त्यांची पाळी आली की प्रवासी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. आज दुपारी शिवाई - ई बस क्र. एम एच ४९ झेड ४६६८ नागपूरच्या इमामवाडा डेपोची बस, नागपूर रहिवासी चालक सूरज नेवारे हे चंद्रपूर बसस्थानकात बस घेऊन जात असताना प्रवेशद्वाराबाहेर हा अपघात झाला.एवढ्या भरधाव बसखाली मेश्राम यांचा पाय आल्याने त्यांच्या पायाला व मांडीला जबर दुखापत झाली.घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात पाठवले.घटनास्थळी उपस्थित ऑटो चालकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी ही पहिलीच घटना नाही, याआधीही येथे अनेक जण जखमी झाले आहेत.सदर चालक बसस्थानकात बसमध्ये भरधाव वेगाने जात होता, त्यामुळे ऑटो चालकाचा पाय बसच्या पुढील उजव्या चाकाला धडकला आणि ही घटना घडल्याचा आरोप ऑटोचालकाने केला आहे.बस चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.अपघाता घडतच बसचालक सूरज नेवारे यांना रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला देण्यात आला, त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली.