अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद १ कोटी १ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त उमरेड पोलीसांची कारवाई

Fri 28-Mar-2025,09:03 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर 

नागपुर:उमरेड पोलीस स्टेशन उमरेड- दिनांक २७/०३/२०२५ रोजी उमरेड पोलीस अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्तबातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की, भिवापुर कडुन उमरेड च्या दिशेने रेतीचे ट्रक येत असुन अवैधरित्या रेतीची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी कळमना फाटा चौक डी मर्शी हॉटेल जवळ नाकाबंदी करून खालील प्रमाणे कारवाई केली.

१. टिप्पर क. एम.एच-३२ ए.जे २९९९ पोलीसानी सदर टिप्पर थांबवुन टिप्परची तपासणी केली असता टिप्पर मध्ये ५ ब्रास रेती मिळुन आली. टिप्पर चालकाला त्याचे नाव पत्ता विचारले असता प्रज्वल विनोद गायकवाड वय २२ वर्ष रा. कोरंबी ता.पवनी जि. भंडारा अशी माहीती प्राप्त झाली. २. टिप्पर क. एम. एच-३६ एफ ३६०५ पोलीसांनी सदर टिप्पर थांबवुन टिप्परची तपासणी केली असता टिप्पर मध्ये ५ ब्रास रेती मिळून आली. टिप्पर चालकाला त्याचे नाव पत्ता विचारले असता अरविंद बेनेश्वर कांबळे वय २३ वर्ष रा. मेंढा ता. पवनी जि. भंडारा अशी माहीती प्राप्त झाली. ३. टिप्पर क एम एच-३६ ए.ए ३६०५ पोलीसांनी सदर टिप्पर थांबवुन टिप्परची तपासणी केली असता टिप्पर मध्ये ५ ब्रास रेती मिळुन आली. टिप्पर चालकाला त्याचे नाव पत्ता विचारले असता विष्णु पुंडलीक वाघधरे, वय ३२ वर्ष रा. धानोरी ता. पवनी जि. भंडारा अशी माहीती प्राप्त झाली. ४. टिप्पर क. एम एच-३६ ए.ए. ५६०५ पोलीसांनी सदर टिप्पर थीबवुन टिप्परची तपासणी केली असता टिप्पर मध्ये ५ ब्रास रेती मिळून आली. टिप्पर चालकाला त्याचे नाव पत्ता विचारले असत्ता सहादेव रमेश बोकंडे वय ३६वर्ष रा. रवनी ता. पवनी जि. भंडारा अशी माहीती प्राप्त झाली. नमुद वाहन चालकाला परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले पोलीसांनी पंचासमक्ष १) ४ वाहना मधुन २० ब्रास रेती किंमती १,००,०००/- रूपये आणि २) नमुद ४ टिप्पर प्रत्येकी २५,००,०००/- असा एकुण १,०१,००,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

नमूद टिप्पर चालक आरोपीतांवर पोस्टे उमरेड येथे कलम ३०३(२),४९ भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सह कलम ४,२१ खाण खनिज अधिनियम,सह कलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम, सह कलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १३०,१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.