चंद्रपूर एमआयडीसी मध्ये भीषण आग : लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनी जळून खाक

Tue 25-Mar-2025,03:36 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीत ही आग लागली असून आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने शेजारील कंपन्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, प्रचंड धुराचे लोट आणि आगीच्या लोळ परिसरात पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांमध्येही घबराट पसरली.सुदैवाने आगीमुळे कोणतेही जीवितहानीचे वृत्त नाही, मात्र कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कंपनी परिसरात कोणतीही प्रभावी अग्निरोधक यंत्रणा नव्हती,यामुळे आगीने वेगाने उग्र रूप धारण केले. कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आग आटोक्यात आणण्यात अडचणी आल्या, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,कंपनीने योग्य ती सुरक्षा यंत्रणा बसवली असती,तर आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आले असते.