घरफोडी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद

Tue 25-Mar-2025,10:26 PM IST -07:00
Beach Activities

 सुनिल हिंगे ( अल्लिपुर )

चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे घडली. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे घरफोडी करणारे तीन चोरटेसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांकडून कसोशीने शोध घेतला जातआहे. विठ्ठल वॉर्ड येथील रहिवासी राजू कलोडे, जयभीम वॉर्डातील रंदावा थूल, सुनील वाघमारे यांची घरे फोडून चोरट्यांनी चोरीकेली. तपासणी केली असतादोन युवक रात्रीच्या वेळी भगतसिंग चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर ते तेथून माजी ग्रामपंचायत सदस्य बच्चू वाटखेडे त्यांच्या घराच्या मागून सिमेंट रस्त्याने गेले पुढील तपास अल्लिपुर पोलीस करीत आहे