प्रवासी ऑटोमधुन दारूची वाहतुक करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Fri 22-Nov-2024,08:54 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बख्श

वर्धा:आज दि 22/11/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा रिमडोह हॉटेल रायगड समोर, एन.एच. 44 सर्व्हिस रोडवर सापळा रचुन एका काळ्या रंगाचा ऑटो क्र. MH-31/CV-5949 यावर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता, सदर ऑटोमध्ये चालक 1) नारायण शंकर शहारकर, रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट, एक ईसम 2) आनंद नंदु भाट, रा. कंज्जर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपुर व एक महिला 3) मंदाबाई शामकिशोर कंज्जर, रा. कंज्जर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपुर हजर मिळुन आले असुन, ऑटोमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल मिळुन आला असुन, सदर दारूचा माल हा 4) सारंग बागडी रा. राममंदिर वार्ड हिंगणघाट याचे मालकिचा असुन, दारूचा माल 5) राधा आनंद भाट, रा. कंज्जर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपुर हिने दिल्याचे सांगितल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीतांचे ताब्यातुन 1) एक काळ्या रंगाचा ऑटो क्र. MH-31/CV-5949 किं. 1,20,000 रू. 2) 02 एअरबॅग व 01 स्कुलबॅग मध्ये देशी दारूने भरलेल्या एकुण 500 सिलबंद शिशा कि. 50,000 रू 3) 02 एअरबॅगमध्ये विदेशी दारूने भरलेल्या 96 सिलबंद शिशा कि. 33,600 रू, 4) 03 अॅन्ड्रोईंड मोबाईल कि. 45,000 रू व 05 बॅग कि. 2,500 रू असा जु.किं. 2,51,100 रू चा मुद्देमाल जप्त करून, 05 आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. 

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे सा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी सा.यांचे निर्देशाप्रमाणे पो.अं. मनोज धात्रक,अरविंद येनुरकर,रवि पुरोहित, अभिषेक नाईक,विनोद कापसे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.