संत चोखोबा वार्ड,संत नगाजी मंदिर,हिंगणघाट येथे शहरांतील शिवसेना शाखा क्र.४चे भव्य जल्लोषात उद्घाटन समारंभ पार पडला

Wed 19-Mar-2025,09:51 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी मंगेश लोखंडे हिंगणघाट

हिंगणघाट आज दि.१९/३/२०२५ बुधवार ला सायं.९.००वा. संत चोखोबा वार्ड, संत नगाजी मंदिर,हिंगणघाट येथे शहरांतील शाखा क्र.४चे भव्य जल्लोषात उद्घाटन समारंभ पार पडला.वं.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू राहण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री (म.रा.) यांच्या नेतृत्वाखाली तसेच कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तालुकाप्रमुख अमित गावंडे यांनी शिवसेना पक्षाची संघटनात्मक मजबूत बांधणी करण्यासाठी "वार्ड तिथे शाखा" व घराघरात शिवसेना कशी पोहोचवता येईल याकरीता तालुक्यातील प्रत्येक गावात व शहरांतील प्रत्येक वार्ड मधे शाखांचे व शिवसैनिकांचे प्रवेश लावण्याचे प्रयत्न चालू आहेत.त्यामधे शिवसेना पक्षाला बरयापैकी यश संपादन होत असल्याचे दिसून येते आहे.या उद्घाटन समारंभाला राजु हिंगमिरे जिल्हा संघटक,रवि धोटे उपजिल्हाप्रमुख, अमित गावंडे तालुकाप्रमुख, प्रशांत लहामगे शहरप्रमुख, सुनिता तांबोळी शहरप्रमुख महिला आघाडी,दिनेश काटकर उपजिल्हाप्रमुख युवासेना,अमित काळे शहर समन्वयक प्रामुख्याने उपस्थित होते. छ.शिवाजी महाराजांचे माल्यार्पण करुन बॅंड व फटाक्यांची आतिषबाजीमधे मोठ्या उत्साहात उद्घाटन समारोह पार पडला.त्यानंतर संत नगाजी महाराज मंदिर येथे विलास हांडे यांच्या नेतृत्वाखाली त्या वार्डातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसैनिक म्हणून पक्षात प्रवेश केला.या समारंभाला यशस्वी करण्यासाठी सोनू लांजेवार, प्रविण वैरागडे, प्रतिक चापले, आतिश उताणे, कुलभूषण वासनिक व विलास हांडे मित्र परिवार यांनी खुप मेहनत घेतली व यशस्वीपणे जोशपुर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला