एस.ओ.एस.कब्स वरुड मध्ये "बालक दिवस" उत्साहात संपन्न

Sat 16-Nov-2024,07:28 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि रवी वाहणे शेदूर्जनाघाट

वरूड:स्थानिक:-कै. राधिका मेघे महिला शिक्षण संस्था द्वारा संचालित एस.ओ.एस.कब्स,वरुड या शाळेमध्ये नुकताच दि. १४ नोव्हेंबर रोजी "बालक दिवस" मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या निमित्ताने "मिस-मॅच फॅशन शो"या मजेशीर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय गमतीदार वेशभूषा करून उपस्थितांची दाद मागितली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच परिक्षक म्हणून रोकडे ज्वेलर्स,खादी साडी,सत्यम साडी त्यांच्या माॅडेल ॲड.सोनल सराटकर या लाभल्या होत्या.पाहुण्यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरू आणि माता सरस्वती च्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.एकंदरीत सर्वच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार अभिनय करत परिक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले.शेवटी परिक्षकांनी अतिशय काळजीपूर्वक परिक्षण केले आणि ज्ञानदा निचीत हिचा प्रथम क्रमांक तर नीर यावलकर द्वितीय क्रमांक आणि लक्ष खुटेटा याने तृतीय क्रमांक प्राप्त केला त्याचप्रमाणे माही वानखडे,जेहरा जावेद खान या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस वितरण करण्यात आले.यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांच्या वयाचा जर विचार केला तर आपल्याला त्या वयात काहीच कळत नव्हतं आज हे विद्यार्थी उत्कृष्ट अभिनय करत आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे विचार यावेळी व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनीत कुमार दुबे शैक्षणिक समन्वयक रुपाली काळे प्रशासन अधिकारी सुशील उघडे प्री-प्रायमरीच्या शैक्षणिक समन्वयक किर्ती बोंडे , सह शिक्षिका वर्षा यावलकर, शितल उघडे,सीमा देशमुख, तेजस्विनी चोरे,रसिका उपासे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजल देशमुख तसेच आभारप्रदर्शन रश्मी फाटे यांनी केले.त्याचप्रमाणे या बालक दिनाच्या निमित्ताने प्रायमरी विभागातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर नाटिका सादर केली तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले आणि काही विद्यार्थ्यांनी बालगीते सादर करून उपस्थितांची दाद मागितली.यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी अनुश्री होले,रिया खोडे यांनी संचालन केले व मनस्वी देशमुख हिने आभारप्रदर्शन केले.याप्रसंगी कला विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, आणि संगणक विभाग त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.