बल्लारपूर शहरातील 2019 नंतर बांधण्यात आलेल्या सी.सी रस्ते व बाजूला बसविण्यात आलेल्या पेव्हरचा दर्जा

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:शहरातील 2019 नंतर बांधण्यात आलेल्या सी.सी रस्त्यांवर व बाजूस बसविण्यात आलेल्या पेव्हरचा दर्जा तत्काळ तपासण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी आम आदमी पक्षाने बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व स्थानिक आमदार यांच्याकडे केली आहे.गेल्या काही वर्षांत सीसी रस्ते तयार करून पेव्हर बसवण्यात आले, मात्र यातील अनेक बांधकामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच हे रस्ते व पेव्हर खराब झाले असून,या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी केली आहे.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व आमदार यांनी याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास नागरिकांच्या हितासाठी पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
मुद्दे:-2019 नंतर बांधलेले अनेक सीसी रस्ते आणि पेव्हर जीर्ण अवस्थेत आहेत.या बांधकामांमध्ये निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला आहे.मानकांनुसार रस्ते बांधलेले नाहीत. हे रस्ते आणि पेव्हर अल्पावधीतच खराब झाले आहेत.या प्रकरणी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.गुणवत्ता तपासणी समिती स्थापन करावी.समितीमध्ये PWD आणि नगरपरिषदेचे अनुभवी अभियंते आणि नागरी व राष्ट्रीय पक्षांचे शहराध्यक्ष निवडा.भविष्यात दर्जेदार बांधकामाची खात्री करावी.तपास समिती दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करा. सर्व जीर्ण सी.सी रस्ते व पेव्हर तातडीने दुरुस्त करावेत.निकृष्ट बांधकामामुळे बल्लारपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने नगरपरिषद व आमदार यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे.यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष अस्लम शेख, आगार विभाग अध्यक्ष शर्मन बन्सल,युवा उपाध्यक्ष स्नेहा गौर, CYSS प्रमुख सम्यक गायकवाड, CYSS सचिव हर्षद खंडागडे आदी उपस्थित होते.