प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीचे सर्वेक्षण करून गरीबांना घरे द्या: आमदार समिर कुणावार यांची सभागृहात मागणी

अब्दुल कदीर बख्श हिंगणघाट
हिंगणघाट: केंद्र सरकारनेच्या वतीने गरीबांना हक्काचे घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना व महाराष्ट्र सरकारचा वतीने मोदी आवास योजना अमलात आणली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात अनेक गरजू लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर या सर्वेक्षणात अपात्र ठरविण्यात आलेल्या तसेच सुटलेल्या लाभार्थाचा समावेश प्र परीपत्रक ड मध्ये समावेश करण्यात आला होता.मात्र सरकारकडून अद्यापही या संबंधी ठोस निर्णय घेतला नाही यामुळे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिर कुणावार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात प्रधानमंत्री आवास योजने संबधी मुद्दा उपस्थित केला. तसेच आमदार समिर कुणावार यांनी प्रधानमंत्री आवास योजना व मोदी आवास योजना हा प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यावर तातडीने लक्ष द्यावे.तसेच प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजनेचा पहिल्या हप्ता सहा सहा महिने दिल्या जात नाही यामुळे गोरगरीब लोकांना पंचायत समिती तसेच नगर परिषदेकडे चकरा माराव्या लागत आहे तरी पहिला हप्ता ३० दिवसाचे आत मिळाला पाहिजे अशी मागणी सभागृहात आमदार समिर कुणावार यांनी केले यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आवास योजनेचा पहिल्या हप्त्याला विलंब करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल तसेच प्रधानमंत्री आवास योजना प्ररीपत्रक ड चे सर्वेक्षण करून गरजू गरीब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना व मोदी आवास योजनेचा लाभ दिल्या जाईल असे आश्वासन दिले.
(यावेळी आमदार समिर कुणावार यांनी हिंगणघाट शहरात मंजूर करण्यात आलेले ४०० खाटाचे रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावी या मंजूर रुग्णालयाची वाट विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.यामुळे यावर तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन कामाला सुरुवात करावी अशी मागणी सुध्दा सभागृहात मंत्री महोदया समोर केली आहे.)