ब्रह्मपुरी तालुका क्रीडा संकुलात भारताचे महान धावपटू कॅप्टन मिल्खा सिंग यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
फ्लाईंग सिख कॅप्टन.मिल्खा सिंग यांचे जीवन संघर्ष हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे:- भाऊराव राऊत
ब्रम्हपुरी :- आज दिनांक २१/११/२०२४ ला सायं. ५:४० वाजता तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी येथे भारताचे प्रसिद्ध धावपटू फ्लाईंग सिख , कॅप्टन.मिल्खा सिंग यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सामजिक विचारवंत व सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक भाऊरावजी राऊत सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय तंत्रनिकेतन, ब्रम्हपुरी चे प्रबंधक धिरजशाह मडावी सर,क्रीडा प्रशिक्षक राहूल जुआरे सर ,फिजिकल ट्रेनर प्रफुल नागापूरे सर, फिजिकल ट्रेनर विजय ठाकरे सर, फिजिकल ट्रेनर गौरव करंबे सर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते कॅप्टन. मिल्खा सिंग यांच्या प्रतिमेला माल्यर्पण व पुष्पअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी अध्यक्ष मार्गदर्शनात माननीय राऊत सर यांनी भारतीय सेनेचे जाबाज सैनिक कॅप्टन. मिल्खा सिंग यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले कॅप्टन मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हे.१९२९ ला आजच्या पाकिस्तान मधील गोविंदपुरा येथे एका शिख परिवारात झाला ते बालवयापासूनच आपल्या घरापासून ते शाळेपर्यंत रोज धावत जायचे व शाळेची सुट्टी झाल्यानंतर सुद्धा ते धावत घरी परतायचे देशाची फाळणी झाल्यानंतर मिल्खा सिंग यांचे भारतामध्ये स्थानांतर झाले त्यानंतर त्यांचा जीवन हा अतिशय संघर्षमय राहिलेला आहे भारतीय सेने मध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी स्पोर्ट्स मध्ये सहभाग घेऊन अतिशय कठीण परिश्रम घेत ऍथलेटिक्सच्या अतिशय कठीण मानल्या जाणाऱ्या ४०० मीटर व २०० मिटर दौड स्पर्धेत सहभाग घेत एशियन चॅम्पियनशिप मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय मेडल पटकाविला व त्यानंतर सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशासाठी अनेक मेडल्स मिळविले त्याबद्दल कॅप्टन मिल्का सिंग यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला तर पाकिस्तान येथे झालेल्या ४०० मिटर दौड च्या मैत्रीपूर्ण सामन्यात कॅप्टन मिल्खा सिंग यांची अभूतपूर्व दौड बघता त्यावेळेचे पाकिस्तानचे जनरल आयुब खान यांनी कॅप्टन मिल्खा सिंग यांना "फ्लाईंग सिख" ही उपाधी दिली याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली या कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विहार मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक राहुल जुआरे सर तर आभार देवा मिसार यांनी मानले.