जनहितासाठी महात्मा फुले यांचे कल्याणकारी विचार अंगिकरुया

Thu 28-Nov-2024,11:13 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

तालुका माळी समाजाचे अध्यक्ष रणजित बनकर यांचे प्रतिपादन आरमोरीत महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन आरमोरी जिल्हा गडचिरोली जनकल्याणाकरिता अहोरात्र झटणारे शिक्षण, उद्योग व समतेचे पुरस्कर्ते, महात्मा ज्योतिबा फुले यांचे कल्याणकारी विचार हे आम्हाला लाभलेले अनमोल भांडार आहे.त्यांच्या अक्षय कल्याणकारी विचारांचा वारसा अंगिकारुन भविष्यकालीन वाटचाल करुया असे प्रतिपादन आरमोरी तालुका माळी समाज संघटनेचे अध्यक्ष रणजित बनकर यांनी केले.ते तालुका माळी समाज संघटना आरमोरी व तात्यासाहेब फुले दाम्पंत्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा फुले स्मृतिदिन कार्यक्रमात (दि.२८ नोव्हेंबर )बोलत होते.

सर्वप्रथमत: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच समाजबांधवांनी महात्मा फुले अमर रहे! अशा घोषणा दिल्या.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तालुका माळी समाजाचे पदाधिकारी गुरुदास बोरुले,प्रतिभा नंदरधने, क्रांती बोरुले,व्यंकट कोटरंगे,लोमेश कोटरंगे,विठ्ठले,सुरेश वाटगुरे,रामहरी वाटगुरे,मधुकरराव ठाकरे,अभिमन्यु निकुरे, मिलिंद वाढी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना बनकर म्हणाले की,महात्मा फुले यांनी शिक्षण, कृषी, सिंचन, व्यवसाय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.तसेच प्रकृती गंभीर असतांनाही विपुल लेखन केले.यात शेतकरी वर्गाच्या समस्या व उपाय असलेला शेतकऱ्यांचा आसूड,गुलामगिरी,गद्य व पद्य लेखन केले .तसेच साहित्यातूनही सामाजिक क्रांती तेवत ठेवली होती.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या व्यक्तिमत्वाचे विचार अंगिकारणे काळाची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.

उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर भाष्य केले.

कार्यक्रमाची सांगता महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित गितांनी झाली.