1,44,900/- रू चा दारू सड़वा जप्त
कदीर बख्श
पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 31/10/2024 रोजी पोस्टे परिसरात दिवाळी उत्सव संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, सुनील भोसले राहणार खैराटी पारधी बेडा हा खैराठी पारधीबेडा येथील नालाजवळ अवैदयरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरिता कच्चा मोहन रसायन सडवा गाळीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती ठाणेदार मनोज गभने सा. यांना देवून त्यांचे आदेशाने मौजा खैराटी येथे पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे खैराटी पारधीबेडा येथे रेड केला असता 1) 09 लोखंडी ड्रममध्ये 1350 लिटर मोहन रसायन सडवा कीं. 67,000 रू 2) 03 मोठे प्लास्टिक ड्रम मधे 450 लिटर मोहन रसायन सडवा कीं 22500,रू 3)09 छोटे प्लास्तक ड्रममध्ये 900 लिटर मोहन रसायन सडवा कीं 45,000रू 4) ड्रमसाहित्य कीं.10,900 रू असा एकूण जु. कीं. 1,44,900/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर कच्चा मोहन रसायन सडवा व साहित्य नाश करून करून आरोपी सुनील भोसले रा खैराटी बेढा याचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पो. उपनी. भारत वर्मा सा. डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोना विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.