हिंगणघाट शहरात पोलिसांचा रूट मार्च,निवडणुकीच्या अनुषंगाने शांतता सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन
अब्दुल कदीर बख्श
हिगणघाट वर्धा पोलीस विभागाच्या वतीने दिनांक 29/10/2024 व दिनांक 01/11/2024 रोजी हिंगणघाट पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गाने पथसंचलन करून विधानसभा निवडणूक व दिवाळी सन डोळ्यापुढे ठेऊन शांतता, सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन केले. हिंगणघाट शहरातील महत्वाच्या आणि मुख्य मार्गाने पथसचलन करण्यात आले.हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुक व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुवेवस्था अबाधित राहावी याकरिता शहरातील मुख्य मार्गाने रुटमार्चचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या रुटमार्च मध्ये पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डा. सागरकुमार बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनोज गभने, 06 पोलिस अधिकारी, 50 पोलिस अंमलदार, तसेच आयटीबीपी पथक हिंगणघाट सहभागी झाले होते. रूटमार्च हा संपूर्ण हिंगनघाट शहरातून विठोबा चौक, आंबेडकर चौक,सुभाष चौक, रुबा चौक, चौधरी चौक, कारंजा चौक, आठवडी बाजार, असा काढण्यात आला होता.