उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध कारवाई
प्रतीनीधी आसीफ मलनस ( हिंगणघाट )
05-12-2024 रोजी मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की आरोपी (1) प्रविण सुधाकर मेश्राम, वय 34, रा. घाट सावली, ता. हिंगणघाट हा मालक आरोपी क्र (2) विनोद शिंदे, वणी त. हिंगणघाट याचा सांगणे वरून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक MH 32 P 5511 निळ्या रंगाच्या सोनालिका कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये वणा नदीच्या पात्राचे सोनेगाव बिड घाट येथून काळी रेती चोरून मौजा वणी कडे वाहतूक करीत आहे अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी क्र 1 च्या ताब्यातील ट्रॅक्टर यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काडी रेती( गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिडून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास काडी रेती (गौन खनिज ) असा जो कि 7,57,000/- रु चा माल मिडून आल्याने , पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे परत येवुन आरोपीतान विरूध्द गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे पथकतील .पोलीस हवालदार नरेंद्र डहाके , अश्विन सुखदेवे, पोलीस शिपाई आकाश कांबळे,राकेश इतवारे यांनी केली.