महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी युवारंग तर्फे आरमोरीत निशुल्क कराटे प्रशिक्षण
जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी:- देशात व राज्यात सर्वत्र महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे ही बाब हेरून युवारंग तर्फे मागील ७ वर्षापासून सातत्याने निशुल्क कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे यामध्ये आतापर्यंत ३००० महिला व मुलींनी आत्मरक्षणाचे धडे घेतले आहेत सदर कराटे प्रशिक्षणाची सुरुवात २० ऑक्टोंबर २०२४ रविवार पासून स्थळ -स्वामी विवेकानंद विद्यालय ,आरमोरी येथे सायंकाळी ५:१५ वाजता होणार आहे या प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त महिला व मुलींनी सहभाग घ्यावा असे युवारंग तर्फे जाहीर करण्यात आले आहे सदर प्रशिक्षणामध्ये सहभाग घेण्यासाठी राजमाता जिजाऊ कराटे ग्रुपचे संयोजक रोहित बावनकर , युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे ,युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम, युवारंग चे कार्य सचिव पंकज इंदूरकर ,कार्य सहसचिव लीलाधर मेश्राम,सदस्य गोपाल नारनवरे, सुमित खेडकर,यांच्याशी संपर्क साधावा.