बल्लारपूरातून मोबाइल चोरट्याकडून ९ मोबाइल जप्त:स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर शहरातून एका मोबाईल चोरट्यांकडून स्थानिक गुन्हे शाखेने ९ मोबाईल हस्तगत केले. २३ ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. बल्लारशा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, रोहित सुरेश गिरी, (२२) रा. शांती नगर, सरकारी दवाखान्या मागे बल्लारपूर याचे जवळ चोरीचे मोबाईल आहे, अशा माहितीवरून आरोपीचे घरी जावून झडती घेतली असता, त्याचे घरी पेपर मिल सात नंबर गेट येथून ट्रक ड्रायव्हर चे मोबाईल चोरी गेले होते. ट्रक ड्रायव्हर यांनी पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे तक्रार दाखल केले होते. अप क्र.९८५/२०२४ कलम ३०३(२) बीएनएस मधील चोरीस गेला १ मोबाईल व इतर कंपनीचे ८ संशयित मोबाईल असा एकुण ८७ हजार रुपये चे मोबाइल जप्ती करण्यात आले आहे. नमूद आरोपीस जप्त मोबाइलसह पोलीस स्टेशन बल्लारशाह यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदर कारवाई कार्यवाही परी. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनी दीपक कांक्रेडवार, सपोनी बलराम झाडोकर, पोउपनी संतोष निंभोरकर, पो हवा. नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पोआ किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघटे, प्रमोद कोटणाके, प्रसाद गुलदांदे यांनी केले.