हिंगणघाट येथे १० नोव्हेंबर रोजी निशुल्क कृत्रिम हात पाय (जयपुर फुट्स) शिबिर

Tue 22-Oct-2024,06:11 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर 

हिंगणघाट:अखिल भारतीय मारवाडी युवा मंच अंतर्गत एलिट लेडीज विंग शाखा हिंगणघाट चे वतीने दिनांक १० नोव्हेंबर रोजी मिशन साधू वासवानी पुणे यांचे द्वारे निशुल्क कृत्रिम हात पाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत हातपाय लावण्यात येईल. जे दिव्यांग व्यक्ती आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करीत आहे. त्यांना या शिबिराचा लाभ मिळून स्वावलंबी व्हावे. हा प्रमुख उद्देश या शिबिराच्या आयोजनामागील आहे. हिंगणघाट येथील स्थानिक रत्न विद्या निकेतन बन्सीलाल कटारिया हायस्कूल येथे सकाळी ९ ते १ यादरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याकरिता इच्छुकांनी ५.नोव्हेंबर पूर्वी अरिहंत क्रिटिकल केअर ,आय एम ए हॉल समोर हिंगणघाट येथे संपर्क साधून नोंदणी करावी किंवा ९४२३६८०८८९, ८८३०५८०६४९, ९५१८५७१२०६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सुद्धा नोंदणी करता येईल. अशी माहिती अध्यक्षा अर्पणा मराठी सचिव अंकिता मुंधडा कोषाध्यक्ष हेमा चितलांगे यांनी दिली आहे.