भवानी माता मंदिर खंडाळा घटस्थापना

Tue 08-Oct-2024,09:18 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:शैलेश झाडे वर्धा 

 

वर्धा:दरवर्षी प्रमाणे यंदाही कायम स्वरुपी असलेले समुद्रपुर तालुक्यातील खंडाळा येथे भवानी माता मंदिर येथे दिनांक 3/१०/२4ला दरवर्षी प्रमाणे यंदाही घटस्थापना करण्यात आली आहे. इथं खास वैशिष्ट्य म्हणजे भवानी आई ची स्वयंभू मूर्ती आहे कमीत कमी १५० वर्षा पूर्वी या मुतीॅ ची स्थापना झालेली असुन निरंतर खंडाळा ग्रामस्थ येथे घटस्थापना करत आहे. नवनवीन भंजन गीत गायन दुगाॅसप्तसथी पठन या मंदिरा मधे सुरू आहे आणि इथले खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्म समभाव हा मंत्र जपत इथे सर्व धर्मातील लोक भवानी माता मंदिर खंडाळा येथील कायॅक्रमात सहभागी होत असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही दिनांक 9/१०/२4भव्य दिव्य असा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे भवानी आई ची गोंधळ महाआरती होणार आहे. गावातील भवानी माता महीला भजन मंडळ .संपूर्ण ग्रामस्थ आणि कायॅकरते या मधे सहभागी होऊन हा कार्यक्रम संपन्न करत आहे.तरी संपुर्ण परिसरातील नागरिकांनी आवाहन करण्यात येत आहे की महाप्रसाद कायॅक्रमा साठी उपस्थित राहावे